Abdul Sattar
Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

Team Agrowon

Akola News जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीमुळे (Hailstorm) पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून एकत्रिम अंतिम अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन तातडीने मदत देईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले.

जिल्ह्यात पातूर तालुक्यातील बेलुरा शिवारात सत्तार यांनी पीक नुकसानाची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. बेलुरा शिवारात अविनाश देशमुख यांच्या लिंबू बागेची तर पुंडलिक डांगे यांच्या कांदा पिकाची त्यांनी पाहणी केली.

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

अविनाश देशमुख यांच्या लिंबू बागेत वादळ, गारपिटीमुळे झाडे पडली. फळ गळती झाली. याची कृषिमंत्र्यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेजारीच डांगे यांच्या कांदा पिकाचेही पावसाने प्रचंड नुकसान झाले. यालाही भेट देऊन सत्तार यांनी चर्चा केली.

ते म्हणाले, की नुकसानाचे प्रमाण अधिक आहे. सद्यःस्थितीत उभ्या असलेल्या पिकांचे यामुळे नुकसान झाले असून यंत्रणेला पंचनाम्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

त्यानंतर याचे काम सुरू झाले आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल लवकर तयार करून जिल्ह्याने शासनाकडे पाठवावा, असे सूचवण्यात आल्याचे ते म्हणाले.

राज्यात विविध जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीने नुकसान झाले आहे. ठिकठिकाणची परिस्थिती भिन्न असून अहवालानंतरच शासनाला शेतकऱ्यांना योग्य ती मदत करता येईल, असेही सत्तार म्हणाले.

दुर्घटनास्थळी भेट

पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेले सत्तार यांनी पारस (ता. बाळापूर) येथे रविवारी (ता. ९) रात्री झालेल्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली. बाबूजी महाराज मंदिर परिसरात असलेले १०० वर्षे जुने निंबाचे झाड वादळामुळे पडल्याने त्याखाली दबून सात जणांचा मृत्यू झाला होता.

येथे भेट देत त्यांनी पाहणी केली तसेच अकोला येथे जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली. यानंतर सत्तार हे बुलडाणा जिल्ह्यात पीक नुकसान पाहणीसाठी रवाना झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT