Chana Crop Agrowon
ताज्या बातम्या

Chana Crop : पळसवाडी येथे हरभरा पिकांची पाहणी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्ताने आहारातील तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगत त्यांनी पौष्टिक तृणधान्य या विषयी सविस्तर माहिती दिली.

Team Agrowon

गल्लेबोरगाव : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (Millet) तसेच रब्बी पिकांची सध्यस्थिती व केंद्र पुरस्कृत योजना अंमलबजावणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission) अंतर्गत क्षेत्रीय भेटीसाठी कॉटन डेव्हलपमेंट नागपूर (Cotton Development Nagpur) येथील अधिकारी पी. एस. गायकवाड यांनी पळसवाडी (ता.खुलताबाद) येथे रब्बी हंगाम (Rabbi Season) पीक प्रकल्पातील रब्बी ज्वारी (Jowar), हरभरा आदी (Chana Crop) पिकांची पाहणी केली.

यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्ताने आहारातील तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगत त्यांनी पौष्टिक तृणधान्य या विषयी सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहारदूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी श्री. घनबहारदूर यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विशद केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी व्ही. एल. नरवडे, वैशाली पवार यांनीही शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. आत्माचे अधिकारी श्री. पाठक यांनी तृणधान्याचे महत्त्व सांगितले.

यावेळी कृषी सहायक संजय धबाले, पल्लवी गायकवाड, मनिषा डवारे, श्रीमती गिराम, शिवाजी औटे, विलास ठेंगडे, कृष्णा ठेंगडे, अण्णा काळे, अप्पा काळे, बापू काळे, किशोर ठेंगडे, गणेश ठेंगडे, विजय वाकळे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी सहायक संजय धबाले तर आभार दादासाहेब जगताप यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT