Agriculture Inputs Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Inputs : पुणे जिल्ह्यात २१२७ निविष्ठा नमुन्यांची तपासणी

Kharif Season 2023 : जिल्ह्यात बियाण्यांचे २१५८, खतांचे २४४० व कीटकनाशकांचे २३८८ विक्रेते आहेत. या विक्रेत्यांमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना निविष्ठा पुरविल्या जातात.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत निविष्ठांचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना उच्चतम गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाच्या कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात निरीक्षकांनी २१२७ कृषी निविष्ठा नमुन्यांची तपासणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात बियाण्यांचे २१५८, खतांचे २४४० व कीटकनाशकांचे २३८८ विक्रेते आहेत. या विक्रेत्यांमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना निविष्ठा पुरविल्या जातात. मात्र शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात येते. या सर्व विक्रेत्यांकडील निविष्ठा गुणवत्तेबाबत चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविल्या. त्यासाठी भरारी पथकांना नमुन्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले.

गेल्या वर्षी कृषी निविष्ठांच्या नमुने तपासणीसाठी ३८ निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी बियाण्यांचे १०३७, खतांचे ६२३, तर कीटकनाशकांचे ४६० नमुन्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.

त्यापैकी बियाण्यांचे १०२०, खतांचे ६२८, तर कीटकनाशकांचे ४७९ नमुने घेऊन तपासणी केली. त्यापैकी बियाण्यांचे ४४, खतांचे ५५, कीटकनाशकांचे ११ नमुने अप्रमाणित आढळून आले. तर खरीप, रब्बी हंगामात खतांचे २८, बियाण्यांचे २१ नमुने अप्रमाणित आढळून आले.

विक्रेत्यांवर गुन्हे

दरम्यान, सहा कीटकनाशक विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अप्रमाणित बियाणे विक्री प्रकरणी १५, खते ११ तर ६ कीटकनाशके विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय बियाणे विक्रीसाठी १७, खते विक्रीसाठी १४ आणि कीटकनाशके विक्रीप्रकरणी ६ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले.

खरिपात कृषी सेवा केंद्र चालकांकडून अव्वाच्या सव्वा दराने निविष्ठांची विक्री होऊ नये, चांगल्या दर्जाच्या निविष्ठा मिळाव्यात, यासाठी १५ भरारी पथके स्थापन करण्यात आली. त्या भरारी पथकांमार्फत ही तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT