Indrayani River Pollution Agrowon
ताज्या बातम्या

River Pollution Measures : इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत उपाययोजनांना गती देणार

River Cleaning : इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबतचा विषय प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे.

Team Agrowon

Pune News : इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबतचा (Indrayani River Pollution) विषय प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. या अनुषंगाने लवकरच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ (Pollution Control Board) यांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजनांबाबतच्या कृती आराखड्याला गती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

‘चला जाणूया नदीला’ अभियानासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बुधवारी (ता.३) बोलत होते.

बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, जलबिरादरीचे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र चूग, नदी प्रहरी विनोद बोधवनकर, डॉ. सुमंत पांडे, शैलजा देशपांडे, अनुजा बाली आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विषयामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील तत्काळ उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. या उपाययोजनांमध्ये पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. नद्या या आपला मोठा वारसा असून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासात नद्यांचे मोठे योगदान आहे.

चला जाणूया नदीला अभियानासाठी जिल्हा नियोजन समितीतून लवकरात लवकर निधी वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येईल. देहू आळंदी विकास आराखडा, स्वच्छ भारत अभियान आदींसोबत हे अभियान कसे जोडता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

या अभियानाला तालुका पातळीपर्यंत गतिमान करण्यासाठी उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दरमहा किमान एक बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येतील.’’

कार्यकारी अभियंता डॉ. पाटील म्हणाले, ‘‘या अभियानात जिल्ह्यातील ११ नद्यांचा समावेश आहे. जलसंपदा विभागाचे सर्व क्षेत्रीय स्तरावरील शाखा अभियंता आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग आदींचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग अभियान यशस्वी करण्यासाठी वाढविण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

Sugar Production: जालन्यात साखर उतारा ७.४१ टक्के

India US Trade Deal: अमेरिकेपुढे नांगी

US Global Leadership: अमेरिकन प्रभावाच्या ऱ्हासाची सुरुवात

SCROLL FOR NEXT