Indrayani Rice Festival
Indrayani Rice Festival Agrowon
ताज्या बातम्या

Indrayni Rice Festival : पुण्यात इंद्रायणी तांदूळ महोत्सव

टीम ॲग्रोवन

पुणे : माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मावळ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर (Maval Agro Farmer Producer Company) कंपनीने पुण्यात १२ डिसेंबरपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे (Indrayani Rice Festival) आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शंभर दिवस चालणार आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या आवारात हा महोत्सव भरणार असल्याची माहिती मावळ अॅग्रो फार्मर कंपनीचे अध्यक्ष माऊली दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, संचालक रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, कर्ज अधीक्षक गिरीश जाधव, नीरज पवार, भाऊसाहेब दाभणे, संजय ढोरे आदी उपस्थित होते.

शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मावळमधील शेतकऱ्यांनी खास पिकविलेला इंद्रायणी वाण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. सध्या तालुक्यात कंपनीचे १६५ शेतकरी सभासद असून, त्यांनी १२६५ हेक्टरवर भाताचे उत्पादन घेतले आहे. कंपनीने इंद्रायणी वाणाचे भेसळ नसलेला तांदूळ ग्राहकांना देण्याचा उद्देश ठेवला आहे. त्यानुसार कंपनीने नियोजन केले आहे.

ग्राहकांना प्रति किलो ५५ रुपये दराने विक्री केला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने इंद्रायणी मावळचा वैभव हा ब्रॅण्ड तयार केला असून पाच किलो, दहा किलो आणि तीस किलो अशा पॅकिंगमध्ये हा तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार आहे.मावळ तालुक्यातील एकूण ५५ सोसायट्यांनी उत्पादित होणाऱ्या भात खरेदीचा संकल्प केला आहे. त्यासाठी कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला असून, उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर तालुक्यांतही राबविला जाणार आहे.

‘पीडीसीसी’ बँकेचे अर्थसाह्य

कंपनीला ‘पीडीसीसी’ बँकेच्या असलेल्या शाखेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. त्यासाठी दहा टक्के एवढा व्याजदर आकारण्यात आला आहे. या रकमेपैकी आतापर्यंत ७५ लाख रुपयांचे ३५० टन तांदूळ खरेदी करण्यात आला आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले असून संस्थांना जो काही नफा होईल, त्याचा लाभांश पुन्हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

बँकेकडून नर्सरी, कृषी पर्यटन, गृहकर्ज, शिक्षण अशा विविध बाबीसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही विशेष बाब म्हणून प्राथमिक स्वरूपात पाच कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी सर्व संचालकांची मान्यता घेतली आहे. तांदळाचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास आगामी काळात कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात येईल.
डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT