Animal Care Agrowon
ताज्या बातम्या

भारतीय पशुवैद्यक संशोधन परिषद स्थापन करावी

राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान अकादमीच्या दिक्षांत सोहळ्यात मागणी

टीम ॲग्रोवन

नागपूर : भारतीय शेती पद्धतीत जनावरांचा उपयोग होत आला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. त्यातूनच पोषणमूल्यांचा अंतर्भाव असलेल्या शेतमालाची उपलब्धता झाली. याला चालना मिळावी याकरिता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या धर्तीवर स्वतंत्र भारतीय पशुवैद्यक संशोधन परिषद स्थापन करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान अकादमीचे अध्यक्ष प्रकाश राव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पशुवैद्यक विज्ञान अकादमी, नवी दिल्ली यांच्या २० व्या वार्षिक दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, कामधेनू पशुवैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दक्षिणकर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे माजी सचिव तरुण श्रीधर यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रातील नामांकित वीस ज्येष्ठ पशुवैद्यकांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. सोबतच डॉ. मोहन भागवत, पुरुषोत्तम रूपाला, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, तरुण श्रीधर आणि उमेश चंद्र शर्मा यांना मानद फेलोशिप देत गौरविण्यात आले. प्रसिद्ध पशुवैद्यक एम. एल. मदान, के. के. सरमा आणि ससम्मा आयपे या पद्मश्री पुरस्कृत पशुवैद्यकांना सुद्धा या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी ‘माफसू’च्या कार्याचा आढावा सादर केला. तसेच भारतीय पशुवैद्यक संशोधन परिषदेस मूर्त रूप देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातून पशुवैद्य क्षेत्रात संशोधन कार्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध होऊन पायाभूत सुविधा मजबूत होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री रूपाला यांनी बहुसंख्य शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळेच या शेतीपूरक व्यवसायाचे महत्त्व ओळखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना मिळाली आहे असे सांगितले.

यानिमित्ताने पशुवैद्यक अधिवेशनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पशुवैद्यक शिक्षण, संशोधन आणि विस्ताराच्या पुनर्रचनेतून देशाच्या सकल उत्पादनास चालना देणे या विषयावर यावेळी मंथन होणार आहे. देशभरातील नामांकित पशुवैद्यक, शास्त्रज्ञ या चर्चासत्रात सहभाग घेतील.

मी स्वतः नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा पदवीधर आहे. त्यामुळे पशुवैद्यक क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांची जाण आहे. या जाणिवेतूनच भारतीय पशुवैद्यक संशोधन परिषदेची स्थापना करण्याची किती गरज आहे याची कल्पना मला आहे.
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT