Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्याच्या काही भागांत अजूनही थंडी कायम

राज्यात उन्हाचा चटक्यामुळे कमाल तापमानात वाढ कायम आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात अद्यापही थंडी कायम आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्यात उन्हाचा चटक्यामुळे (Heat) कमाल तापमानात वाढ कायम आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात अद्यापही थंडी (Cold) कायम आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा (Maximum Temperature) पारा ३६ अंशापार होता.

रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमानात वाढ झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या, दुपारच्या वेळी घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दुसरीकडे पहाटेच्या वेळी गारठाही कायम असल्याने परस्पर विरोधी स्थिती तयार झाली आहे.

कोकणातील रत्नागिरीसह सांताक्रूझ येथे ३७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि विदर्भातील अकोला, वाशीम आणि वाशीम येथे पारा ३६ अंशांच्या पार होता.

राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र निफाड येथे हुडहुडी कायम आहे. तर पुणे, जळगाव, धुळे येथे गारठा टिकून आहे. राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.५ (९.४), जळगाव - (१०.०), धुळे ३४.०(१०.०), कोल्हापूर ३५.० (१८.५), महाबळेश्वर ३०.९ (१५.४), नाशिक ३३.४ (११.०), निफाड ३४.२(६.०), सांगली ३५.६ (१७.२), सातारा ३४.५ (१३.७), सोलापूर ३६.६ (१६.६),

सांताक्रूझ ३७.९ (१९.०), डहाणू ३१.० (१९.१), रत्नागिरी ३८.३ (१८.५), औरंगाबाद ३५.० (१२.८), नांदेड - (१६.२), परभणी ३५.६(१६.२), अकोला ३६.३ (१४.९),

अमरावती ३५.४(१६.१), बुलढाणा ३२.६(१७.६), ब्रह्मपूरी ३५.७ (१७.९), चंद्रपूर ३२.६ (१७.२), गडचिरोली ३१.६(१३.६), गोंदिया ३३.२ (१५.०), नागपूर ३३.० (१५.४), वर्धा ३५.६(१७.५), वाशीम ३६.२ (१४.८), यवतमाळ ३४.२ (१५.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT