Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : कमाल, किमान तापमानात वाढ शक्‍य

 डॉ. रामचंद्र साबळे 

महाराष्ट्रावर आज व उद्या १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब (Air Pressure) राहील. जेव्हा कमाल व किमान तापमानात (Temperature) वाढ होते तेव्हा हवेचे दाब कमी होतात. मात्र बुधवारी (ता. ३०) हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल होतील तेव्हा थंडीत (Cold Weather) पुन्हा वाढ होईल. गुरुवारी (ता.१ डिसेंबर) हवेचे दाबात १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होईल. त्यामुळे पुन्हा थंडीत वाढ होईल. शुक्रवार (ता.२ डिसेंबर) रोजी पुन्हा हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल होतील, तेव्हा तापमान वाढण्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे थंडीवर त्याचा परिणाम होईल. विदर्भात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण चांगले राहील. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे त्याचा परिणाम थंडीवर होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. हवामान थंड व कोरडे राहील.

कोकण ः

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मि.मी. व उद्या २६ मि.मी., तर रत्नागिरी जिल्ह्यात आज ३ मि.मी. व उद्या १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८० ते ८८ टक्के, रायगड जिल्ह्यात ६१ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४७ ते ५१ टक्के, रायगड जिल्ह्यात ३७ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

कमाल तापमान नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नाशिक जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २८ ते ३३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

मराठवाडा ः

उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, जालना, नांदेड जिल्ह्यांत तुलनेने कमाल तापमान कमी राहील. किमान तापमान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, नांदेड व परभणी जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान बीड जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ५० टक्के, नांदेड व बीड जिल्ह्यांत ४५ टक्के, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४६ ते ४७ टक्के, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २३ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व

अमरावती जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २३ टक्के राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ ः

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर व वर्धा जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस तर यवतमाळ जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ ः

कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५० ते ५१ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.

दक्षिण- पश्‍चिम महाराष्ट्र ः

कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आज १५ ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १८ ते २९ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७४ ते ८८ टक्के, तर नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत ४७ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ५० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला ः

- गव्हाच्या पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत सिंचनाचे योग्य नियोजन करावे.

- थंडीच्या काळात वासरांना अधिक आहार देणे आणि त्यांच्या शरीराचे तापमान नियमन ठेवणे आवश्यक आहे.

- फळबागांमध्ये रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून उष्णता निर्माण करावी.

- कुक्कुटपालन शेडमध्ये उष्णतेसाठी लाईटचे बल्ब लावावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT