Latur News: उदगीर तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या व कालव्यांना पूर येऊन खरीप पिके वाहून गेली. त्यासोबतच जमीनही खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले व हेक्टरी ४७ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. मात्र, तब्बल तीन महिन्यांनंतर शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपयांची मदत मिळत आहे. घोषणा ४७ हजाराची करून शासन फक्त पाच हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. घोषणा एक आणि प्रत्यक्षात मदत वेगळीच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..उदगीर तालुक्यात ऑगस्ट २०२५ मध्ये ३२१.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ९४४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी १ कोटी ५१ लाख १६ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यापैकी ३७० शेतकऱ्यांना ८१ लाख ५८ हजार रुपये वाटप करण्यात आले. अद्याप ५७४ शेतकरी व ७० लाखांचा निधी शिल्लक आहे. यामध्ये संयुक्त खातेदारांना संमती नसलेले ३७, न्यायालयात वाद असलेले ३६, गावातील राहत नसलेले ४५, मृत परंतु वारसा संमती नसलेले २८ तर बहुभूधारक ४२८ शेतकरी खातेदारांना ही मदत देण्यात आलेली नाही..Flood Damage Compensation : अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मिळाले केवळ १.७७ कोटी.तालुक्यात सप्टेंबर मध्ये २८४.२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले तर १०७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी १ कोटी ३३ लाख ५७ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यापैकी ५४० शेतकऱ्यांना ४२ लाख ५७ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. अद्याप ५३१ शेतकरी व ९१ लाखाचा निधी शिल्लक आहे. यामध्ये संयुक्त खातेदारांना संमती नसलेले २५, न्यायालयात वाद असलेले ३१, गावातील राहत नसलेले १०, मृत परंतु वारसा संमती नसलेले ३८ तर बहुभूधारक ४२७ शेतकरी खातेदारांना ही मदत देण्यात आलेली नाही..Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश .यापैकी काही गावे वगळता बहुतांशी गावामध्ये शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपयांची मदत खरडून गेलेल्या जमिनीसाठी देण्यात आलेली आहे. शासनाने बहुभुधारकांना सुद्धा दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देणार असल्याचे घोषित करून सुद्धा अद्याप बहुभूधारक शेतकऱ्यांना एक रुपये दमडीही मदत दिली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग शासनाच्या घोषणेनुसार मदत देण्याची मागणी करत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके हातून गेली आहे. त्यात आता शासनाकडून देण्यात येणारी मुदतही कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे..४७ हजारांची घोषणा करून फक्त पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. शेतकऱ्यांची यापेक्षा मोठी चेष्टा काय असू शकते? मदत देणं होत नसेल तर घोषणा करायची कशाला?, शासनाने घोषित केल्याप्रमाणे ४७ हजार द्यावेत. त्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाहीत.- संतोष पाटील, तोंडार.अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दोन-तीन वेळा पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने त्यावरचे पीकही गेले. शासनाने ४७ हजारांची मदत घोषित केली. मात्र केवळ पाच हजार रुपये खात्यात आल्याने शासनाची घोषणाही हवेतच असल्याचे दिसून येते.- राजकुमार बदनाळे, शेतकरी, देवर्जन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.