Groundnut Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Groundnut Cultivation : खानदेशात भुईमूग लागवडीत वाढ शक्य

Groundnut Crop : खानदेशात यंदाही भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ होईल, असे दिसत आहे. अनेक भागांत पेरणी किंवा लागवड पूर्ण झाली आहे. सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवर भुईमुगाचे एकूण क्षेत्र राहील, असाही अंदाज आहे.

Team Agrowon

Kahandesh Groundnut Cultivation : जळगाव ः खानदेशात यंदाही भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ होईल, असे दिसत आहे. अनेक भागांत पेरणी किंवा लागवड पूर्ण झाली आहे. सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवर भुईमुगाचे एकूण क्षेत्र राहील, असाही अंदाज आहे.
भुईमुगाची लागवड खानदेशात मागील तीन वर्षे सतत वाढली आहे. टिकून असलेले दर व कांदा, इतर भाजीपाला पिके व केळीच्या तुलनेत कमी श्रम यामुळे लागवड वाढली असून, तापी व गिरणा काठासह सातपुडालगत अनेक शेतकरी या पिकाला पसंती देत आहेत. २०१८ मध्ये खानदेशात भुईमुगाचे क्षेत्र सुमारे १०० ते १५० हेक्टर एवढेच होते.

अधिक उत्पादन खर्च, पाण्याची कमतरता या समस्या होत्या. पण २०१९ पासून २०२२ पर्यंत चांगले पाऊसमान राहिले. यंदा पाऊस कमी आहे. परंतु तापी, गिरणा पट्ट्यातील लागवड स्थिर राहील किंवा किंचित वाढूदेखील शकते. भुईमुगाला पाणी अधिकचे लागते. पाऊस कमी अधिक असल्याने अनेक शेतकरी तुषार, ठिबक सिंचनाच्या मदतीने लागवड करीत आहेत. काळ्या कसदार, मध्यम जमिनीत पीक जोमात येते, असे शेतकरी मानतात. खानदेशात सातपुडा पर्वतालगत अधिकची लागवड व्हायची. परंतु ही लागवड अलीकडे वाढली आहे.

कारण सातपुडा पर्वतालगत कृत्रीम जलस्रोत बऱ्यापैकी आहेत. तसेच वाणही अनेक उपलब्ध झाले आहेत. कमी कालावधी, कमी पाण्यात येणारे वाणही आहेत. त्यांचा उपयोग करून शेतकरी भुईमुगाचे एकरी १७ ते १८ क्विंटल (ओल्या शेंगा) उत्पादन घेत आहेत. २०१९ मध्ये सुमारे २५० हेक्टरवर लागवड झाली. यानंतर २०२० मध्ये कोविड असतानाही भुईमुगाला उठाव होता. या वर्षीदेखील सुमारे ४०० हेक्टरवर लागवड होती. २०२१ मध्ये लागवड सुमारे ५०० हेक्टरवर झाली होती. २०२२ मधील लागवड वाढून ती ७०० हेक्टरवर पोहोचली. तर यंदाची लागवड सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवर पोहोचेल. भुईमुगाचे दरही मागील दोन हंगाम स्थिर होते. खरिपात फारशी लागवड होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT