Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : गारठा वाढला; आज पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच शुक्रवारी (ता. ९) किमान तापमानात अचानक मोठी घट झाली.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील (Bay Of Bengal) वादळी प्रणालीच्या (Cyclone) प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान (Favorable condition For Rain) होत आहे. यातच शुक्रवारी (ता. ९) किमान तापमानात (Temperature) अचानक मोठी घट झाली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.३ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असल्याने राजस्थानातील चुरू येथे शुक्रवारी (ता. ८) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडी वाढल्याने निफाड, धुळे, औरंगाबाद, गोंदिया, पुणे, परभणी, नागपूर, नाशिक येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला. तर सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३३.१ अंश तापमान नोंदले गेले. आजपासून (ता. १०) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

१० अंशांपेक्षा कमी

तापमान असलेली ठिकाणे

परभणी (कृषी विद्यापीठ) ६.३, निफाड ७.२, धुळे ७.५, औरंगाबाद ७.९, गोंदिया ८.८, पुणे ९.४, परभणी ९.४, नागपूर ९.९, नाशिक १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT