Soybean, Tur Agrowon
ताज्या बातम्या

New Crop Verities : तूर, सोयाबीन, करडईच्या वाणांचा देशाच्या राजपत्रात समावेश

देशाच्या राजपत्रामधील समावेशामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्‍यास मदत होईल, असे कुलगुरूच डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी सांगितले.

Team Agrowon

परभणी ः केंद्रीय बियाणे समितीच्‍या (Seed Committee) शिफारशीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा (Tur Verity) बीडीएन २०१३-२ (रेणुका), सोयाबीनचा एमएयूएस -७२५ (Soybean MAUS -725) , करडईचा (Safflower) पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या तीन वाणांचा (Crop Verities) समावेश भारताचे राजपत्रामध्ये (द गॅझेट ऑफ इंडिया) करण्‍यात आला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने त्याबाबतची अधिसूचना सोमवारी (ता. ६) प्रसिद्ध केली आहे. देशाच्या राजपत्रामधील समावेशामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्‍यास मदत होईल, असे कुलगुरूच डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी सांगितले.

याबद्दल करडई पैदासकार डॉ. श्यामराव घुगे, तूर पैदासकार डॉ. डी. के. पाटील, सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे आदींसह सर्व संबंधित शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले. तुरीच्या रेणुका वाणास महाराष्‍ट्र, गुजरात, मध्‍य प्रदेश, राजस्‍थान, छत्तीसगड आदी राज्‍यांकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्‍याची मान्‍यता देण्‍यात आली आहे.

सोयाबीनच्या एमएयुएस-७२५ आणि करडईच्या पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांना राज्‍यात लागवडीस मान्‍यता प्राप्‍त झाली आहे.

देशाच्‍या राजपत्रातील समावेशामुळे या तीन वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बियाणे साखळीमध्ये घेता येईल, असे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

SCROLL FOR NEXT