Maratha Reservation Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Reservation : कानगावात बंद; निषेध फेरी

Jalna Violence : आंतरवाली सराटीतील घटनेचे पुणे जिल्ह्यात पडसाद

Team Agrowon

Pune News : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचे पडसाद पुणे जिल्ह्यात उमटण्यास सुरवात झाली आहे. कानगाव (ता. दौड) येथे मराठा समाजाने गाव बंद ठेवून रविवारी (ता. ३) निषेध फेरी काढली.

राज्य सरकार व गृह विभागाचा या वेळी निषेध नोंदविला. वास्तविक, अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. दौंड तालुक्यातील कानगावमध्ये निषेध फेरी काढून व टायर जाळून संताप व्यक्त करण्यात आला.

या वेळी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यासह कानगाव ग्रामस्थ व युवा वर्ग सहभागी झाला होता. राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ‘‘सरकार प्रशासन न्यायालयीन लढाई लढत आहे. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. म्हणून ५८ मराठा मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने झाले.

या मोर्चाची दखल देशासह जगाने घेतली. परंतु अद्यापही मराठा आरक्षणाचा तिढा सुटायला तयार नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातच भर म्हणून जालना जिल्ह्यात जो प्रकार घडला, त्यामुळे मराठा समाज आता शांततेच्या मार्गाने नव्हे तर आक्रमक मार्गाने आंदोलनामध्ये उतरताना दिसत आहे.

राज्य सरकारने वेळीच न्यायालयीन लढाई लढून मराठा समाजाला न्याय देणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलनाचे उग्र रूप निर्माण झाल्यास ते कोणाच्या हिताचे होणार नाही,’’ असे शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dam Water Storage Update: नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३०.८६ टक्के पाणीसाठा

Raigad Safety Alert: रायगडला सतर्कतेचा इशारा

Modern Farming: शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पारंपरिक शेतीतून बाहेर पडावे : दीपक वैद्य

Nilanga Crop Competition Winners: निलंग्यात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

SCROLL FOR NEXT