Salam Kisan Store  Agrowon
ताज्या बातम्या

Salam Kisan: वर्धा येथे सलाम किसान स्टोअरचे उद्घाटन

वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून अनेक शेतकरी माती परीक्षणासाठी आपल्या शेतातील मातीचे नमुने घेऊन आले होते.

Team Agrowon

वर्धा येथील व्हिजन मोटर्सचा (Vision Motors) शुभारंभ व आयशर ट्रॅक्टर्सचा वितरण सोहळा २३ मार्च रोजी पार पडला. त्या निमित्ताने `सलाम किसान समूह, (Salam Kisan Group) मुंबई`मार्फत ९० सेकंदात मोफत माती परीक्षण (Soil Test) व ड्रोन द्वारे फवारणीचे (Drone Spraying) प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून अनेक शेतकरी माती परीक्षणासाठी आपल्या शेतातील मातीचे नमुने घेऊन आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी `सलाम किसान`च्या सेवा व कृषी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

वर्धा जिल्हा कृषी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष रवी शेंडे यांच्या हस्ते वर्धा येथील सलाम किसान स्टोअरचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी सलाम किसान समुहाचे प्रमुख मार्गदर्शक योगेश मानधनी, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, आयशर ट्रॅक्टर्सचे झोनल मॅनेजर ललितकुमार जैन, एरिया मॅनेजर गिरीश चंद्र, रिजनल मॅनेजर सुदर्शन जी.टी., एरिया सर्व्हिस मॅनेजर विजय ठाकुर, श्याम मुंदडा, नरेंद्र सावरकर, सुमीत मुंगले आदी उपस्थित होते.

आमदार रणिजत कांबळे यांनी ९० सेकंदांत माती परीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. त्यांनी `सलाम किसान`चे प्रमुख मार्गदर्शक योगेश मानधनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली.

`सलाम किसान`कडून दिल्या जाणाऱ्या सेवा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचा अभिप्राय आमदार कांबळे यांनी यावेळी दिला. तसेच `सलाम किसान`च्या संस्थापक धनश्री मानधनी यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT