Salam Kisan: `सलाम किसान`कडून माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन

सलाम किसान (मुंबई) समूहाने शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरविण्यासाठी अभियान सुरू केले आहे.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

सलाम किसान (मुंबई) समूहाने (Salam Kisan) शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर (Modern Agriculture Technology) आधारित सेवा पुरविण्यासाठी अभियान सुरू केले आहे.

भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि सलाम किसान यांच्या तर्फे संयुक्तपणे भिसी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे प्रथमच मोफत माती परीक्षण (Soil Test) व ड्रोन फवारणी (Drone Spraying) चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रात्यक्षिक शुक्रवारी (ता. १०) ए. एन. लॉन या ठिकाणी होणार आहे.

Salam Kisan
Salam Kisan: धनश्री मानधनी यांचा `सलाम किसान`च्या माध्यमातून अभिनव उपक्रम

भिसी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष अभय मुंगले, संस्थेचे व्यवस्थापक राजेश कामडी, संचालक नत्थुजी गेडाम, संस्थेचे डिजिटल मीडिया प्रमुख सुमित मुंगले यांच्याशी चर्चा करून `सलाम किसान`ने या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांनी मातीचा नमुना घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे कळवण्यात आले आहे.

Salam Kisan
Salam Kisan: पंचमहाभूत लोकोत्सवात `सलाम किसान`चा सहभाग

आयआयटी कानपुर या संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या ९० सेकंदात मातीचे परीक्षण करण्यात येणार आहे.

अलीकडच्या काळात शेतीकामासाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. शेतीमध्ये भूमीअभिलेखाच्या नोंदी, खते, किटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापरला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांची फवारणी कशी करायची, याचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखवले जाणार आहे.

‘सलाम किसान' हे एक सुपरॲप असून त्या माध्यमातून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com