Weather Update
Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार?

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी झाला. गुरुवारी राज्यातील बहुतांशी भागांत पाऊस (Rainfall) कमी झाला. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Heavy Rain Orange Alert) जारी केलाय. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

कोकणात गुरुवारी पावसाचा जोर कमी झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी येथे सर्वाधिक १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कणवकवली आणि कंडल या दोन मंडळांमध्येही चांगला पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येते ११८ मिलिमीटर पाऊस झाला. तसचं वाकवली आणि दापोली या दोन्ही मंडळांमध्ये १०२ मिमी. पाऊस पडला. तर इतर भागांत मध्यम पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार सरी पडल्या. तर बहुतांशी भागांत हलक्या सरी पडल्या. कोकणात पावसाचा जोर कमी असल्यानं नद्यांच्या पाणीपातळीत काहीशी घट झाली होती.

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे थैमान सुरू आहे. पावसाची संततधार कायम असल्याने गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला असून तब्बल 18 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गडचिरोली जिल्ह्यात अठरा मार्गावरील वाहतूक बंद आहे. नागपूर जिल्ह्याला देखील पुराच्या पाण्याचा फटका बसला असून अमरावतीच्या वरूड भागातही पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. काही भागात पावसाचा जोर अधिक होता.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र राधानगरीसह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणीपातळी वाढतच राहिली. गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील ७३ बंधारे पाण्याखाली होते. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला. तरी वारणा धरणातून ९४०० क्युसेक तर अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातही बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

मराठवड्यातही अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. तर औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. तर इतर भागांत पावसाचा जोर कमी होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT