Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पंजाब, हरयाणात वादळी वारे, पावसामुळे गहू पीक भुईसपाट

देशातील यंदाच्या गहू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

Team Agrowon

महाराष्ट्रातील शेतकरी  वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीला (Crop Damage) तोंड देत आहेत.  यातच आता पंजाब आणि हरयाणा या प्रमुख गहू उत्पादक (Wheat Producer) राज्यातही वादळी वारे आणि पावसाने थैमान घातले आहे.

गुरुवारी (ता. १६) झालेल्या  पाऊस आणि गारपीटीमुळे पंजाब आणि हरयानातील जिल्ह्यांमध्ये काढणीच्या अवस्थेत असलेले गहू पीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे.

याचा थेट परिणाम देशातील यंदाच्या गहू उत्पादनावर (Wheat Production) होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कमालीचे वाढलेले तापमान आणि आता वादळी वाऱ्यासह गारपीट यामुळे पंजाब आणि हरयाणासह प्रमुख उत्पादक राज्यांमधील गहू उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गहू काढणीच्या अवस्थेत असल्याने नुकसान जास्त होईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. कृषी तज्ज्ञ देविंदर शर्मा म्हणाले की, देशातील वायव्येकडील हवामान पाहता पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

नुकसानीचा अंदाज नंतर घेतला जाणार असला तरी पंजाब आणि हरयाणात वादळी वाऱ्यामुळे काढणीपूर्वीच गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येईल, असे शर्मा यांनी सांगितले. 

दुसऱ्या बाजूला फेब्रुवारी मध्ये वाढलेलं तापमान आणि आताचे ढगाळ हवामान यामुळे पंजाब हरयाना मधील अनेक जिल्ह्यांमध्ये गहू पिकावर तांबेरा रोगाचा शिरकाव झाला आहे.

या रोगामुळे गव्हाच्या वजनात घट होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी पोटॅशियम क्लोराइड ची फवारणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करु नये.

कारण पावसामुळे त्याचा उपयोग होणार नाही. याशिवाय गव्हाला पाणीही देऊ नये. असा सल्ला चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाचे गहू तज्ज्ञ ओ.पी. बिश्नोई यांनी दिला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT