Gram Panchayats Election
Gram Panchayats Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchayat Election : नवापूर तालुक्यात १५ ग्रामपंचायतींत १० उपसरपंच बिनविरोध

Team Agrowon

नवापूर, जि. नंदुरबार : दुसऱ्या टप्प्यातील १५ ग्रामपंचायतींत १० उपसरपंच बिनविरोध, तर पाच ग्रामपंचायतींत निवडणूक (Gram Panchayat Election) झाली. दोन टप्प्यांतील ३० ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवड झाली. तिसऱ्या टप्प्यातील १५ ग्रामपंचायतींची उपसरपंचपदाची निवड ११ नोव्हेंबरला होणार. सरपंच थेट मतदारांनी निवडल्याने आता उपसरपंच मात्र सदस्यांतून असल्याने निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील १५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवड करण्यात आली.

नुकतीच दुसऱ्या टप्प्यातील १५ उपसरपंचांची निवड झाली. नवापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील १० उपसरपंच बिनविरोध निवडले गेले, तर पाच उपसरपंचपदासाठी निवडणुका झाल्या. सर्व ठिकाणी शांततेत निवडणूकप्रक्रिया राबवण्यात आली. नवापूर व विसरवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

नवापूर तालुक्यातील नागझरी, बिलदा, कामोद, रायपूर, भादवड, देवलीपाडा बंधारफळी लहान कळवण, कारेघाट, केलपाडा या दहा ग्रामपंचायतींत उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर नवापाडा, कोकणीपाडा, बिजगाव, खातगाव, सारवट या पाच ग्रामपंचायतींत उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT