Kharip Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Kharip Crop Damage : नगर जिल्ह्यात पावसाने खरिपाची पिके हिरावली

सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहत असल्याने कापूस, बाजरी, सोयाबीन कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. तुरीलाही पावसाचा फटका बसत आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस (Rainfall) सुरू असल्याने बहुतांश भागात खरिपाची पिके (Kharip Crop) हिरावली आहेत. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहत असल्याने कापूस, बाजरी, सोयाबीन कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. तुरीलाही (Tur Crop Damage) पावसाचा फटका बसत आहे.

कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती गोळा करून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार यंदा खरिपातील नुकसानीचा आकडा एक लाख हेक्टरच्यावर जाण्याची शक्यता आहे.नगर जिल्ह्यात यंदा खरिपात बाजरी, कांदा, कापूस, सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले गेले.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पाऊस पडत आहे. सुरुवातीच्‍या काळात उडीद, मुगाला मोठा फटका बसला. त्यानंतर आता सोयाबीन, कापूस, तूर, कांदा, बाजरीसह भाजीपाल्याला धोका पोचत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शेतात पाणी साचून राहत असल्याने कापसाच्या मुळ्या सडत असून पाने पिवळी पडली आहेत.

त्यामुळे पातेगळ, बोंडालाही नुकसान पोचत आहे. सोयबीनची काढणी सुरू असतानाच पाऊस सुरु असल्याने सोयाबीनची शेतकऱ्यांनी सोंगणी करता येत नाही. बाजरीही काढणीला आली, मात्र पावसामुळे काढणी करण्याला अडथळे निर्माण होत आहेत.

सर्वाधिक फटका सोयाबीनला बसत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन, कापसाचे क्षेत्र वाढले. पिकेही जोमात आली मात्र हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. प्राथमिक माहितीनुसार यंदा खरिपातील नुकसानीचा आकडा एक लाख हेक्टरच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा पावसामुळे कापूस, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. यंदा पिके चांगली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्‍या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांची पिके हिरावली आहेत.

- बाळासाहेब मरकड, शेतकरी, दहिगाव, ता. शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT