Clean Plant Program Agrowon
ताज्या बातम्या

Clean Plant Program : ‘क्‍लिन प्लान्ट प्रोग्राम’ची देशात होणार अंमलबजावणी

Nursery Production : रोगमुक्‍त फलोत्पादन साहित्य उत्पादनासाठी क्‍लिन प्लान्ट कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशा रोपांचे उत्पादन करणाऱ्या अमेरिकेतील खासगी रोपवाटीकांची पाहणी भारतीय शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News : रोगमुक्‍त फलोत्पादन साहित्य उत्पादनासाठी क्‍लिन प्लान्ट कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशा रोपांचे उत्पादन करणाऱ्या अमेरिकेतील खासगी रोपवाटीकांची पाहणी भारतीय शिष्टमंडळाकडून करण्यात आली. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांचाही त्यामध्ये समावेश होता.

पिकात कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यामागे कीड, रोगग्रस्त रोपे-कलमांचा समावेश आहे. रोपवाटिकास्तरावरच योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने फळबागांमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत उत्पादकता घटते. त्या पार्श्‍वभूमीवर जगभरात रोगमुक्‍त कलमांच्या उत्पादनावर भर दिला जात आहे.

त्याकरता क्‍लिन प्लॉट प्रोग्रामची अंमलबजावणी केली जात आहे. रोगमुक्‍त रोपांची निर्मिती, कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने बागेतील कीटकनाशकांच्या फवारण्या कमी होत उत्पादकता खर्चातही बचत, दर्जेदार रोपांपासून गुणवत्तापूर्ण फळांचे उत्पादन, हवामान बदलाला संवेदनशील वाणांचा प्रसार असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अमेरिकेत अशाप्रकारची व्यवस्था फार पूर्वीपासूनच विकसित करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संशोधकांच्या एका पथकाने क्‍लिन प्लान्ट कार्यक्रमाची अंमलबजावणी त्या ठिकाणी कशी होते?

यासाठीची केंद्र कसे काम करतात? हे जाणून घेण्यासाठी या केंद्रांना भेट दिली. शिष्टमंडळात नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड, भारतीय कृषी संशोधन परिषद यासह केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांचाही समावेश होता. एशियन डेव्हलपमेंट बॅंक यांच्या निधीतून हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.

क्‍लिन प्लान्ट प्रोग्रामची अमेरिकेत कशी अंमलबजावणी होते, हे अभ्यासण्यात आले. भारतीय विविध फळपिकांसाठी योग्य मॉडेल विकसित करण्यासाठी हा अनुभव उपयुक्‍त ठरणार आहे. या शिष्टमंडळाच्या शिफारशी भारत सरकारला देशात क्‍लिन प्लान्ट कार्यक्रम राबविण्यासाठी पूरक ठरतील.
- डॉ. दिलीप घोष, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?; खर्गेंचा सरकारला सवाल

India US Trade: अमेरिकन आयातशुल्काचा मागील चार महिन्यात महाराष्ट्राला फटका; कृषी निर्यातीत २६.६% घट

MGNREGA Workers Protest: मनरेगा कर्मचारी आंदोलनात; ग्रामीण भागात कामे ठप्प

Monkey Crop Damage: आजऱ्यात माकडांचा वाढला उपद्रव

Rose Harvesting: व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाची काढणी आणि व्यवस्थापनाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT