ताज्या बातम्या

Cotton Crop : कापूस पिकात वेळीच एकात्मिक कीड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन करा

Integrated pest-disease : सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीवरील विविध कीड-रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी वेळीच एकात्मिक कीड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी दिला.

Team Agrowon

Washim News : सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीवरील विविध कीड-रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी वेळीच एकात्मिक कीड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी दिला.

वाशिम जिल्ह्यात कापूस पीक उत्पादन वाढीसाठी पथदर्शक प्रकल्प केव्हीकेचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या साह्याने केंद्रीय कापूस पीक संशोधन संस्था (नागपूर) व कृषी प्रोद्योगिकी अनुप्रयोग अनुसंधान संस्था (पुणे) यांच्या विद्यमाने केव्हीकेमार्फत कापूस पीक एचडीपीएस, सीएस लागवड तंत्रज्ञान : कीड, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर शेतकरी प्रशिक्षण, प्रक्षेत्रभेट कार्यक्रम दोनद (ता. कारंजा) येथे आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक देवेंद्र राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गौरव मानकर व समीर चवरे, संतोष गुल्हाने, ज्ञानेश्‍वर तायडे, कृषी सहायक गजानन राऊत, रामराव डुकरे, ‘केव्हीके’चे पीकसंरक्षण तज्ज्ञ आर. एस. डवरे, कृषी विद्या पीक तज्ज्ञ टी. एस. देशमुख यांची उपस्थिती होती.

गौरव मानकर यांनी विविध शिफारशीत कापूस वाणांची वैशिष्ट्ये सांगितली. टी. एस. देशमुख यांनी कापूस पीक लागवड प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रोत्साहनपर बाबींचे विश्‍लेषण केले. शेतकऱ्यांना कापूस पीक रोपे सघन अतिघनता व कमी अंतर लागवड तंत्राचे फायदे, लागवड क्षेत्राशी अनुकूल असलेल्या संशोधित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. आर. एस. डवरे यांनी एकात्मिक कीड नियंत्रणासाठी मित्र व शत्रू कीड, पांढरीमाशी- माव्यासाठी पिवळे चिकटसापळे, हिरवी गुलाबी बोंड अळीसाठी कामगंध सापळे वापर आर्थिक नुकसानीच्या पातळी आधारित कीड-रोग व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय गिरी यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी वाघ तसेच आभार आदित्य देशमुख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT