Monsoon Rain Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Rains: जुलै महिन्यात सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पाऊस; IMD चा अंदाज

जून महिना देशातील अनेक भागांत जवळपास कोरडा गेला. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. परंतु देशाच्या मध्य भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे देशात जून महिन्यात सरासरीच्या आठ टक्के पावसाची तुट राहिली, असे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.

टीम ॲग्रोवन

पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज दिली आहे. जुलै महिन्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के मॉन्सूनचा पाऊस (Monsoon Rain) होईल, असा अंदाज वर्तवला आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांच्या (Kharif Sowing) दृष्टीने जुलै महिना महत्त्वपूर्ण आहे.

जून महिना देशातील अनेक भागांत जवळपास कोरडा गेला. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. परंतु देशाच्या मध्य भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे देशात जून महिन्यात सरासरीच्या आठ टक्के पावसाची तुट राहिली, असे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. देशाच्या मध्य भागातील राज्यांमध्ये कापूस, सोयाबीन आणि ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या भागात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ५४ टक्के कमी पाऊस झाला.

यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच देशात दाखल झाला. केरळमध्ये २९ मे रोजी मॉन्सून दाखल झाला. परंतु नंतर मात्र त्याची वाटचाल मंदावली. जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कसं राहतं, यावर शेतीची बरीच गणितं अवलंबून आहेत.

जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे देशात पेरण्या घटल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण २५९.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरण्यांमध्ये ४.६३ टक्के घट आहे. गेल्या वर्षी २७२.२१ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT