ताज्या बातम्या

Crop Damage : पिकांच्या नुकसानीकडे कारनदी प्रकल्पाचे दुर्लक्ष

कारनदी प्रकल्पाच्या कालव्यांची अर्धवट कामे आणि कालव्याच्या सदोष बांधकामामुळे माणिकवाडा, साहूर, जामगावसह परिसरांतील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

जि. वर्धा : कारनदी प्रकल्पाच्या (Karnadi Project) कालव्यांची अर्धवट कामे आणि कालव्याच्या सदोष बांधकामामुळे माणिकवाडा, साहूर, जामगावसह परिसरांतील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. नुकसानीची पाहणी करून मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

परंतु निवेदनाची साधी दखलही न घेतल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी कारंजा तालुक्यात कारनदीवर सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचा कालवा आष्टी तालुक्यातील माणिकवाडा, जामगाव, साहूर यांसह अनेक गावातून गेला आहे.

कालवा होऊन अनेक वर्षे झाली. मात्र यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी तर मिळाले नाहीच, परंतु त्यांच्या शेतीपिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. बाधित शेतकऱ्यांनी कार प्रकल्पाच्या कारंजा येथील उपविभागीय कार्यालयास भेट देऊन निवेदन सादर केले होते.

परंतु त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी ईश्‍वर राऊत, राजकुमार कांदे, दिनेश वरकड, अंकित कावडे, भीमराव भुजाडे, सोमेश्‍वर भुजाडे, मंगेश भुजाडे, किशोर बारंगे, प्रकाश पोटे, रामराव परतेती, अशोक मोगरे, अरविंद खराटे, प्रमोद नांदणे, श्यामराव परतेती, धनंजय राऊत, रामदास मोहिते यांनी केली आहे.

पाण्याला सुटला पाझर कालव्याची काही कामे अजूनही अर्धवट आहे. उतार व्यवस्थित नसल्याने सततच्या पावसामुळे कालव्यात साचलेले पाणी पुढे सरकत नसल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्याचा पाझर सुटल्याने पिके खराब झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT