Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : कंधार-लोह्याला न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाऊ

Heavy Rain : निष्क्रिय लोकप्रतिनिधी व बेजाबदार प्रशासनाच्या चुकीमुळे कंधार व लोहा तालुक्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळले आहे.

Team Agrowon

Crop Damage : नांदेड : निष्क्रिय लोकप्रतिनिधी व बेजाबदार प्रशासनाच्या चुकीमुळे कंधार व लोहा तालुक्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळले आहे. या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना नुकसानीबाबत तत्काळ मावेजा मिळण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर कोर्टात जाऊ असा इशारा ‘बीआरएस’चे नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला.

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे इतर तालुक्यांसारखेच कंधार तसेच लोहा तालुक्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले. परंतु नुकसानीच्या निकषातून या दोन्ही तालुक्यांना वगळले आहे. यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निषेधार्थ नुकताच भारत राष्ट्र समितीच्या वतीने आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शंकरअण्णा धोंडगे बोलत होते. या वेळी बीआरएसचे दत्ता पवार, फहीम मोईन, शिवराज पाटील मसलगेकर, सुनील धोंडगे, दत्ता कारामुंगे, गोतम पवार, शिवराज धोंडगे, दिलीप धोंडगे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात इतर तालुक्यांत झालेल्या पावसाप्रमाणेच कंधार तसेच लोहा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीसह खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीबाबत प्रशासनाकडून मागविण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात कंधार व लोहा तालुक्यांत नुकसान झाले नसल्याचा अहवाल बेजाबदार यंत्रणेने पाठविला आहे. २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला, तर त्या ठिकाणी अतिवृष्टी समजली जाते. या दोन्ही तालुक्यांतील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली. परंतु प्राथमिक अहवालात शून्य नुकसान दाखविल्यामुळे पीकविमा तसेच शासनाच्या मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागेल. यामुळे प्रशासनाने तत्काळ फेरसर्व्हे करून समावेश करावा, अन्यथा कोर्टात जाऊ असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PMFME Scheme: पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा फायदा बचत गटांनी घ्यावा; उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे

Onion Farming : कांदा पिकात खते देण्यास वेग

Marathwada Water Crisis: नदीजोड प्रकल्पासाठी जनजागृतीचा निर्धार

Legal Analysis: भारतीय न्यायसंहितेचे योग्य विश्‍लेषण

Farmer Success Story: कथा पुतळा आक्का आणि विलास आबांची...

SCROLL FOR NEXT