Rural Business: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गट दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ मिळाली तर आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम होऊ शकतील. त्यामुळे बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केले..जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि उमेद यांच्या सयुंक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूलच्या पटांगणात सिंधुसरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा प्रारंभ पालकमंत्री श्री.राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,उपाध्यक्ष तुकाराम साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर,माजी आमदार अजित गोगटे, सभापती मिलिंद नाईक,कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर आदी उपस्थित होते..Women Empowerment: बीज बँक ते जिवामृत : महिलांची स्वयंपूर्ण शेतीकडे वाटचाल.पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, की महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे ही काळाची गरज आहे.भविष्यात महिलांची आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविले जातील. जिल्ह्यातील महिला बचत गट कोकणातील विविध फळांपासून दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करीत आहेत. त्यांना बाजारपेठ मिळवुन दिल्यास आपुसकच त्यांची आणि जिल्ह्याची आर्थिक प्रगती होईल. जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांना पाठबळ दिले जाईल..Women Empowerment: महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.खेबडुकर यांनी गेल्या दहा वर्षांत महिला बचत गटांची कामगिरी वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. दहा वर्षांत बचत गटांना ८५० कोटी रुपये वितरीत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले..दरम्यान, सिंधुसरस प्रदर्शनात जिल्ह्यातील ७५ महिला बचत गटांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. विविध उत्पादने या स्टॉलवर विक्रीकरिता उपलब्ध आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.