अभिजीत पोवारGovernment Rules: देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे मानली जातात. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, आर्थिक व्यवहार करणे अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. त्यामुळे केंद्र सरकारने पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून हे नवीन नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहेत..अर्जासाठी अतिरिक्त कागदपत्रे अनिवार्यनवीन नियमांनुसार, आता पॅन कार्डसाठी अर्ज करताना फक्त आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही. अर्जदाराला ओळख आणि जन्मतारीख सिद्ध करणारी अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), तसेच दहावीचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्याचा सरकारचा उद्देश आहे..Kisan Credit Card: ‘किसान क्रेडिट कार्ड’ची वैधता ६ वर्षांपर्यंत वाढणार .आतापर्यंत अनेक वेळा फक्त आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड काढले जात होते. मात्र, काही प्रकरणांमध्ये माहितीतील विसंगती आढळल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, पॅन कार्डवरील सर्व माहिती आधार कार्डशी पूर्णपणे जुळणे बंधनकारक असेल. नाव, जन्मतारीख आणि इतर तपशीलांमध्ये कोणतीही चूक असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो..Digital Ration Card: शिधापत्रिकेसाठी आता पब्लिक लॉगिन सुविधा.त्यामुळे पॅन कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांमधील माहिती अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. विशेषतः आधार आणि इतर कागदपत्रांतील तपशील एकसारखे असणे गरजेचे आहे..नवीन आयकर कायद्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासायाचबरोबर, १ एप्रिलपासून आयकर संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. नवीन आयकर कायदा अधिक सोप्या भाषेत तयार करण्यात आला असून त्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना आयटीआर भरणे सोपे होणार आहे. या बदलांमुळे कर प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होणार असल्याची अपेक्षा सरकार कडून व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.