Narendra Tomar
Narendra Tomar Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘‘देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) दुप्पट करण्याची संकल्पना आम्ही मिशन म्हणून हाती घेतली आहे. उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. कोणाला खात्री करायची असल्यास मी स्वतः मदत करण्यास तयार आहे,’’ असा दावा कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी ‘अॅग्रोवन’शी (Agrowon) बोलताना केला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील सारांश पुढीलप्रमाणे.

१) प्रश्‍न ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचा दावा केंद्र करते. तुम्ही दसपट झाल्याचे सांगतात. तर काही जण उत्पन्न घटल्याचे सांगतात. नेमकी स्थिती काय आहे?

उत्तर ः शेतकऱ्यांचे उत्पन्न विविध भागांत दुप्पट, सहा पट, तर आठ पटीपर्यंत वाढले आहे. शंका असलेल्यांनी माझ्याकडे यावे. त्यांना शेतकऱ्यांचे पत्ते मी देईनच; पण प्रवासभाडेदेखील देईल. त्यांनी अशा शेतकऱ्यांच्या भेटी घ्याव्यात आणि फक्त राजकीय अंगाने न बघता स्वतःच काय ते सांगावे.

२) प्रश्‍न ः राष्ट्रीय डिजिटल कृषी प्रकल्प नेमका काय आहे?

उत्तर ः या डिजिटल प्रकल्पातून राज्यांना शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध व्हावी, असा मध्यवर्ती हेतू आहे. त्याचे उत्पादन, पीक, बॅंकेची माहिती, पिकाची स्थिती, नुकसान याची माहिती त्यात असेल. पारदर्शकता त्यात असेल. पिकाचे क्षेत्र वाढविणे किंवा कमी करण्यासाठी राज्यांना नियोजन करता येईल. केंद्राला मदत करण्यासाठी डाटा मिळेल. अर्थात, शेती विकास प्रक्रियेतील असंतुलन राज्य व केंद्रांनी संयुक्त प्रयत्नांद्वारे दूर करण्याचाही मुख्य उद्देश या प्रकल्पामागे आहे.

३) प्रश्‍न ः केंद्राच्या पीकविमा योजनेबाबत तक्रारी आहेत. काय सुधारणा करणार ?

उत्तर ः विमा योजनेबाबत तर सातत्याने चर्चा होत असते. सूचना येतात. सुधारणाही चालू असतात. आतादेखील आम्ही राज्यांसोबत चर्चा करीत योजनेच्या विविध प्रारूपांना पुढे नेतो आहोत. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कमी समस्यांना तोंड देत मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारेदेखील विम्याच्या विविध मॉडेलवर काम करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT