Fertilizer Use Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Use : पिकनिहाय रासायनिक खतांची निवड कशी करावी?

Fertilizer Update : रासायनिक खतांची निवड करतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रासायनिक खते कशा प्रकारे दिल्यानंतर पिकाला लागू पडतात याविषय़ीही माहिती असने आवश्यक आहे.

Team Agrowon

Fertilizer Management : खते फेकून टाकल्यास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाया जातात. याचा परिणाम खर्चात वाढ आणि उत्पादन (Crop Production) कमी मिळते. पाण्याची प्रत व जमिनीचा प्रकार, क्षाराचे प्रमाण, पाणी आणि जमिनीतील इतर घटक तसेच जमिनीतील जैविक विविधता (Crop Diversity) यावर खताची उपलब्धता अवलंबून आहे.

त्यामुळे रासायनिक खतांची निवड करतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय रासायनिक खते (Chemical Fertilizer) कशा प्रकारे दिल्यानंतर पिकाला लागू पडतात याविषय़ीही माहिती असने आवश्यक आहे. 

रासायनिक खतांची निवड करतांना...

दीर्घकालीन पिकांसाठी नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५,अमोनियम फॉस्फेट यासारख्या संयुक्त खतांचा वापर करावा. 

स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट

डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट

स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).

हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.

साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खताचा वापर करावा.

रासायनिक खते कशी द्यावीत?

साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.

नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाची अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.

चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.

नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.

पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT