Fire Agrowon
ताज्या बातम्या

Satana Fire News : आगीत आदिवासी मजुरांची घरे खाक

सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरांतून मोठमोठे आगीचे व धुराचे लोळ निघत असल्याचे शेजारीच राहणाऱ्या तेजस शेवाळे याच्या लक्षात आले. त्याने लगेच आरडाओरड करत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवले.

Team Agrowon

जायखेडा, ता. सटाणा : येथील वाडीपीसोळ शिवारातील शेती वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या (Tribal Community) राहत्या घरांना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत (Fire) तीन घरांसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.

सुदैवाने तीनही कुटुंबीय मजुरीसाठी बाहेर गेले असल्याने मोठी जीवित हानी टळली. या आगीत पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून तिघांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र आगीचे निश्चित कारण समजू शकले नाहीत.

शनिवार (ता. २८) रोजी सकाळी दादाजी पुंजाराम जगताप, हिम्मत वंकर माळी, महादू बाळू सोनवणे हे तीनही कुटुंब नेहमीप्रमाणे कामाला गेले होते.

सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरांतून मोठमोठे आगीचे व धुराचे लोळ निघत असल्याचे शेजारीच राहणाऱ्या तेजस शेवाळे याच्या लक्षात आले. त्याने लगेच आरडाओरड करत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवले.

त्या शेतकऱ्यांनी लागलीच आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व घरे एकमेकास लागून असल्याने व आगीने रौद्र रूप घेतल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, कपडे व घरातील रोख रक्कम जळून खाक झाले.

या घटनेची माहिती चंद्रकांत शेवाळे यांनी वाडीपीसोळचे पोलिस पाटील योगेश खैरनार, माजी सरपंच दगा सोनवणे यांना कळविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT