Heat Wave  Agrowon
ताज्या बातम्या

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका कायम

राज्याच्या कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका आणि झळा कायम आहे. गारठा कमी होत असतानाच, उकाड्यातही वाढ होत आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्याच्या कमाल तापमानात (Maximum Temperature) झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका (Heat) आणि झळा कायम आहे. गारठा (Cold weather) कमी होत असतानाच, उकाड्यातही वाढ होत आहे.

आज (ता. १) राज्याच्या कमाल व किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

सूर्य तापल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भात उन्हाची ताप अधिक असून, पारा ३८ अंशांवर पोचला आहे.

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ३८.२ अंश तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे तापमान ३८ अंशांवर होते.

वाशीम, अमरावती आणि धुळे येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशाच्या पुढे गेले आहे.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होतच आहे. मंगळवारी (ता. २८) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे असल्याने गारठा कमी होत आहेत.

आज (ता. १) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान

पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता. १) उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात विजा, गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे.

तर जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाना, चंडीगड राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.४ (१२.८), जळगाव ३६.६ (१३), धुळे ३७ (१०.५), कोल्हापूर ३४.८ (१९.१), महाबळेश्वर ३०.८ (१६.७), नाशिक ३५.० (१४.२), निफाड ३४.८(८.८),

सांगली ३४.६ (१८.४), सातारा ३४.९ (१५.९), सोलापूर ३६.८ (२०.१), सांताक्रूझ ३४.८ (१९.२), डहाणू ३१.५ (१८.५), रत्नागिरी ३३.५ (२०.५), छत्रपती संभाजीनगर ३४.४ (१४), नांदेड ३६.४ (१९), परभणी ३६.१(१७.४),

अकोला ३८ (१७.७), अमरावती ३७.२(१७.३), बुलडाणा ३६.४(२०), ब्रह्मपुरी ३८.२ (१८.६), चंद्रपूर ३५.२ (१९.८), गडचिरोली ३३.८(१५.४), गोंदिया ३६.८ (१७), नागपूर ३५.४ (१७.१), वर्धा ३६.५ (१८.५), वाशीम ३७.४ (१४.८), यवतमाळ ३६.२ (१७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Linking Ban: खतांच्या 'लिंकिंग'ला तत्काळ प्रभावानं मनाई, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Monsoon in Kharif : माॅन्सून यंदा लवकर येणार पण पाऊस पडणार का?

Honey Villages: शेलमोहा आणि काकडदाभा होणार मधाची गावे

Cotton Seed Packets Demand: कपाशी बियाण्याच्या ११.४३ लाख पाकिटांची मागणी

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT