Horticulture Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Horticulture Scheme : फळबाग योजना पुन्हा सुरू

रविशंकर चलवदे : शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Phundkar Orchard Cultivation Scheme) एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली आहे. २०२२-२३ या वर्षात इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

या योजनेकरिता किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र अनुज्ञेय आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपीक लागवड करता येईल. या योजनेअंतर्गत पुढील बहुवार्षिक फळपिकांचा आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर व चिकू यांचा समावेश करण्यात आला आहे.

मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणारे शेतकरी यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर नोंदणी करावी. या योजनेतंर्गत अनुदान मंजूर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा व आठ अ नुसार क्षेत्र सर्व्हे नंबर फळपिकांचे नाव, प्रकार, कलमे, रोपे, लागवड अंतराचे परिणाम (मीटरमध्ये) इत्यादी माहिती शेतकऱ्यांनी अचूक भरावी.

महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यापासून योजनेंतर्गत मागील प्राप्त अर्ज ता. ३० नोव्हेंबर पर्यंत प्राप्त होणारे अर्ज आर्थिक लक्ष्यांकाच्या अधीन राहून संगणकीय सोडतीव्दारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासंबंधी माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT