Cotton Rate Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Rate : शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची आशा

ग्रामीण भागात यावर्षी कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापसाची विक्री थांबवली आहे.

Team Agrowon

यवतमाळ : ग्रामीण भागात यावर्षी कापसाच्या उत्पादनात (Cotton production) निम्म्याने घट झाली आहे. शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापसाची विक्री थांबविली आहे. परिणामी बाजारातील आवक मंदावली आहे. कापसाची वेचणी करून साठवणूक केली जात आहे. विविध संघटनांच्या कापूस दरवाढीच्या आंदोलनामुळे भाववाढीची आशा असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ठप्प केली आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे व रासायनिक खताचा तुटवडा या अडचणींचा सामना करत कापूस लागवड झाली होती. कापसाचे पीक जोमात असताना मध्यंतरीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सध्या वेचणीचे कामे सुरू आहेत. मात्र, दर ९००० रुपयांवर असल्याने बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावली आहे. काही भागांत कापसाचे दर नऊ हजार १५० रुपयांपर्यंत गेले. काही दिवसात वाढलेले दर नऊ हजारांच्या आत आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कापसाचे दर कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले. मात्र, अजूनही येथील व्यापाऱ्यांनी दर वाढविलेले नाहीत. त्यामुळे सध्या कापूस विकणार नाही.- रामेश्‍वर गावंडे, शेतकरी, दारव्हा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT