Mango Production Agrowon
ताज्या बातम्या

Mango Production : यंदा केसर आंबा लवकर काढणीस येण्याची आशा ः डॉ. कापसे

काही आंबा बागांमध्ये तर नोव्हेंबरच्या सुरवातीपासूनच मोहोर निघाणृयास सुरवात झाली. आताही थंडी चांगली पडत आहे.

Team Agrowon

औरंगाबाद : काही आंबा बागांमध्ये (Mango Production) तर नोव्हेंबरच्या सुरवातीपासूनच मोहोर निघाणृयास सुरवात झाली. आताही थंडी (Cold Weather) चांगली पडत आहे. त्यामुळे पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण मोहोर ताकदीने बाहेर पडेल असा अंदाज, असल्याचे मत आंबा तज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

सिल्लोड तालुक्यातील मुखपाठ येथील अशोक सूर्यवंशी यांच्या आधुनिक अशा अति घन लागवड पद्धतीने उभारलेल्या अंबाबागेत मोहोर संरक्षणाविषयी मार्गदर्शन करीत होते. डॉ कापसे म्हणाले, की यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे. शेतकऱ्यांनी कल्टार सुद्धा वेळेवर दिलेले आहे. पाऊस जरी उशिरापर्यंत झाला असला तरीही ऑक्टोबर मध्ये नवती आली नाही,

सर्व पाने निरोगी राहिली ,त्यातच शेतकऱ्यांनी झिरो बावन चौतीस, झिरो झिरो ५०, लिहोसीन इत्यादींचा मार्गदर्शन केल्याप्रमाणे बिनचूक वापर केला. बागा निरोगी ठेवल्या आणि आता थंडी सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये १२ ते१५ नोव्हेंबर पासूनच मोहोर निघायला सुरवात झाली आहे. यावर्षी पावसाळा जास्त झाल्याने हवेत आद्रता आणि जमिनीत ओल असल्यामुळे तुडतुड्याचाप्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर भुरी रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. नियंत्रणासाठी आत्तापासूनच फवारणीचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर बागेला नियमित पाणी, फळगळ नियंत्रण, फळांची विरळणी काळजीपूर्वक केल्यास यावर्षी नक्कीच एप्रिलच्या सुरवातीपासूनच फळ काढणे सुरवात होऊ शकते

म्हणजे सुरवातीलाच अगदी दोनशे रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळू शकतो जो की नंतर हळूहळू कमी होत जातो. अशा प्रकारे यावर्षी अंबा बागेतून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होईल, असेही ते म्हणाले.यावेळी राजू घोडके, राजेंद्र गवई, आकाश शेळके, निजूविडू सीड कंपनीचे श्री पवार, प्रा. मुजफ्फर, विश्वजीत सूर्यवंशी, दिनकर चव्हाण, परिसरातील मंडळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT