Ahilyadevi Holkar Women's Honour Agrowon
ताज्या बातम्या

Holkar Award : कर्तबगार महिलांचा होळकर पुरस्काराने उद्या राज्यभर सन्मान

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Ahilyadevi Holkar Women's Honour : पुणे ः राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या भागात महिला व बाल विकास (Women and Child Development ) क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांना बुधवारी (ता. ३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान (Ahilyadevi Holkar Women's Honour) पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ५०० रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप असेल. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान तीन वर्षे काम केलेले असावे तसेच महिला अत्याचारामध्ये या महिलेचा समावेश नसावा अशा अटी या पुरस्कारासाठी ठेवण्यात आलेला आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, या निर्णयासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाठपुरावा केला होता.

त्यामुळे तळागाळात कार्य करणाऱ्या महिलांचे कार्य समाजासमोर येण्यास मदत होणार आहे.
बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, स्वयंसहायता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणात पुढाकार अशा कार्यांमध्ये उत्स्फूर्त भाग घेतलेल्या महिलांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पुरस्कारार्थी महिलांच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचाही समावेश आहे.

लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ समाप्त झालेल्या किंवा बरखास्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या गटांमध्येदेखील पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. पुरस्कारासाठी अंदाजे दोन हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांना उपलब्ध होणाऱ्या जिल्हा परिषद उत्पन्नाच्या १० टक्के निधीतून पुरस्काराचा खर्च करावा, असे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT