eknath khadse  Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Khadse : दूध संघ गैरव्यवहाराच्या गुन्ह्यासाठी ‘हाय होल्टेज ड्रामा’

खडसेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या; भाजपचे आमदार भोळेही आग्रही

टीम ॲग्रोवन

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघात (Milk Producer Corporation) १४ टन लोण्यासह दूध भुकटीची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट लावून सव्वा कोटीची अफरातफर केल्याप्रकरणी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न झाल्याने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) गुरुवारी (ता. १३) शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

दुपारी ४ वाजेपासून पोलिस ठाण्यात दाखल खडसे रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. दरम्यान, याच प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळेही दाखल झाल्यामुळे पोलिस ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले.

...असा आहे प्रकार

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघात साधारण दीड महिन्यापूर्वी तूप विक्रीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी शैलेश सुरेश मोरखडे यांच्या तक्रारीवरून (गु.र.क्र.२७३/२०२२ कलम-४२०,४०६,३४ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नुकतेच दोन दिवस आधी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक व शहर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज सादर करून लोणी (बटर) यासह ८ ते ९ मेट्रिक टन दूध भुकटी परस्पर विक्री करून त्याचा गैरव्यवहार झाल्याचे या तक्रारीत नमूद केले होते.

बुधवारी (ता. १२) दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मागील क्षुल्लक गुन्ह्यात जबाब नोंदवून घेतला, तसेच त्या जबाबाची प्रत त्यांना सुपूर्द केली.

त्यात नमूद केल्याप्रमाणे ८ ऑक्टोबरला त्यांनी दूध संघातील विक्री विभागात कार्यरत संदीप झाडे, स्वप्नील जाधव, रवी वानखेडे, नितीन पाटील, महेंद्र केदार यांना स्टॉक तपासणीच्या सूचना केल्या होत्या. त्यात असे निदर्शनास आले, की २ ऑक्टोबर २०२२ला १४ टन पांढरे लोणी (अंदाजित किंमत ७० ते ८० लाख) संघाच्या बाहेर वाई (जि. सातारा) येथे शीतगृहात पाठविल्याची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यात आली.

प्रत्यक्षात असा कुठलाही माल बाहेर गेला नाही. तर घट लपविण्यासाठी हा उपद्‌व्याप असल्याचे आढळून आले आहे. दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक लिमये यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस दाद देत नाही म्हणून अध्यक्ष मंदाकिनी खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथ शहर पोलिस ठाण्यात धडकले.

निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी या प्रकरणी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crops: यंदा थंडीचा कडाका रब्बी पिकांना असह्य?

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

SCROLL FOR NEXT