Natural Farming Helps Increase Farmers Income: देशातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांनी आधीच नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेशातील रेवा येथे आयोजित केलेल्या नैसर्गिक शेतीवरील शेतकरी परिषदेत बोलत होते..त्यांनी स्वतःच्या शेतात नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत उत्पादनात वाढ मिळवल्याचे सांगितले. शहा पुढे म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मदत होते. तसेच पाण्याची बचत होते आणि रासायनिक खतांमुळे होणाऱ्या रोगाचा धोका कमी होतो. याचा शेतकरी आणि समाजाला याचा फायदा होईल. .शेण आणि गोमूत्राचा वापर करून पारंपारिक शेतीवर आधारित नैसर्गिक शेती करता येते. यामुळे रासायनिक खते आणि कीडनाशशकांची गरज संपेल. त्याचबरोबर निरोगी आणि रसायनमुक्त शेतमाल उत्पादन सुनिश्चित होईल. केवळ एक देशी गाय असल्यास २१ एकर जमिनीवर नैसर्गिक शेती करता येऊ शकते, असे शहा यांनी नमूद केले. .भारतातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांनी याआधीच नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे. अशा शेतकऱ्यांना अधिक पाठबळ देण्यासाठी, सहकार मंत्रालयाने दोन प्रमुख सहकारी संस्थांची स्थापन केली आहेत. ज्या सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादनांचे प्रमाणन, चाचणी, पॅकेजिंग, विपणन आणि निर्यातीची जबाबदारी सांभाळतील..Natural Farming: नैसर्गिक व गो-आधारित शेती पर्यावरणस्नेही .देशभरातील ४०० हून अधिक प्रयोगशाळा लवकरच शेती आणि शेतमाल उत्पादनांना नैसर्गिक म्हणून प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढू शकते. सेंद्रिय उत्पादनांना जगभरातून मोठी मागणी आहे. भारतीय शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचण्यासाठी वैज्ञानिक चाचणी, योग्य प्रमाणपत्र आणि प्रभावी विपणनाची गरज असल्याच्या मुद्यावर त्यांनी भर दिला..Natural Farming : २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन .यावेळी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी, विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे नमूद केले. .दरम्यान, अमित शहा यांनी बसामन मामा गोशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, हा उपक्रम लहान शेतकऱ्यांसाठी एक आदर्श असा आहे. या ठिकाणी गायीच्या शेणाचा वापर करून संपूर्ण नैसर्गिक शेती केली जाते. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव देखील उपस्थित होते..नैसर्गिक शेती म्हणजे काय?नैसर्गिक शेती ही सेंद्रीय आणि पर्यावरणीय शेतीवर आधारित आहे. अशा प्रकारच्या शेती पद्धतीत रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. यामुळे निविष्ठांवर होणाऱ्या खर्चाची बचत होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.