Ambadas Danve
Ambadas Danve Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : शेतकऱ्यांना केलेली मदत फसवी ः दानवे

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पूरग्रस्तांना (Flood Affected) वाढीव दराने साडेतीन हजार कोटींची मदत केल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र अनेक ठिकाणी पंचनामेच (Crop Damage Survey) झालेले नाहीच. मदतीचा निकष एक हेक्टरने वाढवूनही प्रत्यक्ष मदत कमी देण्यात आली आहे. त्यामुळे हे आकडे फसवे आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी रविवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला पैठण येथे होणाऱ्या सभेसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित राहावे यासाठी पैसे दिले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दानवे म्हणाले, की शिंदे- फडणवीस सरकारने अतिवृष्टी पीडितांसाठी साडेतीन हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदतीसाठी निकष एक हेक्टरने वाढवून सुद्धा प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. सरकार एकप्रकारे आकड्यांचा खेळ करतेय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT