IGR Maharashtra : नाशिक नोंदणीकृत दस्तांची प्रमाणित प्रत नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ई-प्रमाण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष न जाता घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रत मिळणार असून, वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संदिप आहेर यांनी दिली..नोंदणीकृत दस्त, सूची क्रमांक २ किंवा विवाह प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आवश्यक असलेल्या नागरिकांनी ई-प्रमाण सेवेचा लाभ घ्यावा. ई-प्रमाण सेवेसाठी epraman.igrmaharashtra.gov.in या पोर्टलचा वापर करता येणार आहे. .One District One Registration: ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे जिल्ह्यात कुठेही दस्तनोंदणी.या सुविधेच्या माध्यमातून आवश्यक नोंदणीकृत दस्त शोधल्यानंतर ई-प्रमाण पोर्टलवर अर्ज करून त्याची डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रत मिळविता येणार आहे. ही सेवा नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असून, सुरक्षित नोंदणी, जलद आणि पारदर्शक कार्यपद्धतीचा लाभ मिळणार आहे..Interview With Shailesh Naval : ‘आधी मोजणी व नंतर नोंदणी’ धोरण राबवविणार.ई-प्रमाण सेवेद्वारे प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी नागरिकांनी प्रथम ई-प्रमाण पोर्टलवर नोंदणी करून लॉगिन करावे. त्यानंतर आवश्यक सेवा निवडून संबंधित तपशील भरून अर्ज करावा. लागू शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रत ऑनलाइन प्राप्त करता येईल. प्रमाणित प्रत एसएमएस आणि ई-मेलद्वारेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे..डिजिटल प्रमाणित प्रतीमुळे खर्चात बचतकागदी स्वरूपातील प्रमाणित प्रत घेण्याच्या तुलनेत डिजिटल प्रमाणित प्रत अधिक किफायतशीर आहे. उदाहरणार्थ, ३० पानांच्या दस्ताची कागदी प्रत घेताना प्रति पान २५ रुपये याप्रमाणे ७५० रुपये खर्च येतो. त्याच दस्ताची डिजिटल प्रमाणित प्रत घेताना पहिल्या २० पानांसाठी १०० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक पानासाठी २ रुपये या दराने उर्वरित १० पानांसाठी २० रुपये, असा एकूण १२० रुपये खर्च येतो. त्यामुळे नागरिकांची ६३० रुपयांची बचत होते. अधिक माहितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ८८८८००७७७..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.