
नाशिक : गेल्या दोन वर्षांत गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट (Corona) असल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला होता; मात्र चालु वर्षी गणेशोत्सवात (Ganesh Utsav 2022) कोणतेही निर्बंध नसल्याने शहरातील भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेश विसर्जनाला शहरात धामधूम होती. ग्रामीण भागात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच अतिवृष्टीने (Heavy Rain Nashik) थैमान घातल्याने जिल्ह्याच्या पश्चिम व पूर्व भागातील पिके पूर पाण्यामुळे उद्ध्वस्त (Crop Damage) झाली. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह काहीसा कमीच होता. पीक नुकसानीमुळे गावशिवारे मात्र, सामसूम होती.
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात विविध भागांत जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले. पदरमोड करून केलेला खर्च मातीमोल झाला. सरकारने एकीकडे मदतही जाहीर केली; मात्र केलेल्या खर्चाच्या तुलनेत ती तोकडी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी गणपती बाप्पा येतो आणि भक्तांवरील दुःख, विघ्न घेऊन जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे; मात्र यंदा गणेशोत्सवात खरीप हंगामात शेतकरी पुरता कोलमडला आहे.
नाशिक शहरात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणुकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा निनादात जंगी मिरवणूक झाल्याने मोठ्या आनंदाचे वातावरण होते. लोकांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला; मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आनंदवर जणू विरजण पडले. ग्रामीण भागात प्रामुख्याने सिन्नर, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, निफाड चांदवड व जिल्ह्याच्या पूर्व भागातील नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचा व ग्रामीण भागातील गणेश भक्तांचा हिरमोड झाला. त्यामुळे मनात एका बाजूला गणेशोत्सवाचे आनंदाचे वातावरण तर दुसरीकडे शिवारे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हसूच हरवल्यासारखी परिस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.