Drought Like Situation: जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र, ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने हे आशादायी चित्र आता बदलू लागले आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पाऊस खूपच कमी झाल्याने मोठी तूट निर्माण झाली असून, त्याचा गंभीर परिणाम खरीप पिकांवर दिसून येत आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे प्राथमिक संकेत दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पीक पाहणीसाठी गठित तालुकास्तरीय समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यासाठी विहित नमुन्यात तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले..जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम २०२६च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सेंगुलवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मुळे, कार्यकारी अभियंता एस. एस. कटकधोंड, .Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.वरिष्ठ भूवैज्ञानिक मांजरमकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रवीण चोपडे आणि कृषी विकास अधिकारी पाटील उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले..Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली.तालुकास्तरीय समित्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन एकत्रित निष्कर्ष आणि शिफारशींसह विविध प्रपत्रांमध्ये विहित नमुन्यात अहवाल सादर करावा. कृषी महाविद्यालयानेही पीक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण अहवाल द्यावा. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ सध्याच्या पीक परिस्थितीचा विचार करून चालणार नाही, तर पुढील काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे पुजार यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित करावी. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन चारा छावण्या आणि चारा डेपोचेही नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक चारा उपलब्ध होईल, याची पूर्वतयारी करावी. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून चारा उपलब्ध करण्यासाठी मदत घेण्याच्या सूचनाही पुजार यांनी दिल्या..पशुधन आणि चाऱ्याचे अचूक गणित मांडानिवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी पशुधन आणि उपलब्ध चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याच्या प्रमाणात तफावत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावागावांतील गोठे आणि त्यामधील पशुसंख्येची माहिती संकलित करावी. प्रत्येक कुटुंबाकडे किती पशुधन आहे, याची माहितीही उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले. .सध्याच्या पीक परिस्थितीचे वास्तव मांडताना कृषी शास्त्रज्ञ अरुण गुट्टे यांनी पावसाच्या दीर्घ खंडामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. काही पिकांना आता पाऊस आला तरी त्याचा उपयोग होणार नाही. ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. तापमान वाढत असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. भारी जमिनीतील पिके वरून हिरवी दिसत असली, तरी सोयाबीनचा दाणा बारीक आहे. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला तर काही पिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो, असे गुट्टे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.