Koyana Dam Rain agrowon
ताज्या बातम्या

Koyana Dam Rain : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये संततधार

Koyna Dam : पाटण तालुक्यात काल दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोयना धरण २५ टक्के भरले आहे.

sandeep Shirguppe

Satara Rain : लांबलेल्या पावसामुळे राज्यात मान्सूनला विलंब झाला. दरम्यान राज्यातील महत्वाच्या धरणांमधील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच स्तरातील लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाटण तालुक्यात काल दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोयना धरण २५ टक्के भरले आहे.

कोयनानगरला पावसाचा जोर कमी असला तरी नवजा व महाबळेश्‍वर परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे मागच्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहिती माहितीनुसार, कोयनानगर येथे ६८ (१०९४) मिलिमीटर, नवजाला ९७ (१५८६) मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला ९१ (१५७१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक पाण्याची आवक वाढली आहे.

तर आज प्रतिसेकंद १२ हजार ४७६ क्युसेक नोंदली गेली आहे. २४ तासांत एक टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. एकूण पाणीसाठा २६.१६ टीएमसी झाला असून, पाणीपातळी २०६९ फूट झाली.

कोयना धरण परिसरात विजनिर्मीती

कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या ४५ दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल १ हजार मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती टप्पा बंद असतानादेखील आत्तापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.

पश्चिम वीजनिर्मिती ५.७८ तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या २.७७ अशा एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३.१८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. पाणीटंचाईच्या काळात एकीकडे सिंचनासाठी काटकसरीने पाणीवापर करताना दुसरीकडे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही वीजनिर्मितीची वाटचाल समाधानकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT