Koyana Dam Satara : यंदा कोयना धरण १०० टक्के भरण्याची शाश्वती नाही, अत्यंत कमी पावसाची नोंद

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे.
Koyana Dam Satara
Koyana Dam Sataraagrowon

Satara Rain News : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. दरम्यान मागच्या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ०.५४ टीएमसीने तर पाणी पातळीत १.२ फुटाने वाढ झाली आहे.

सध्या धरण परिक्षेत्रात एकूण उपलब्ध पाणीसाठा २२.८९ तर त्यापैकी उपयुक्त १७.८९ पाणीसाठा टीएमसी इतका आहे. धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ६,२३८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याची माहिती धरण विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, कोयना, नवजा या भागात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे किंचीत का होईना पाणी पातळीत वाढ होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या २२.८९ टीएमसी साठा आहे.

सध्या जलपातळी ६२८.४७२ मीटरवर असली तरी धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्या टप्प्यामार्फत तयार होणारी वीजनिर्मिती अद्याप बंद आहे. जलपातळी ६३० मीटरच्या वर गेल्यानंतर चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान मागच्या दोन दिवसांत कोयना परिसरात ९ (८८८) मि.मी, नवजा- २७ (१२७४) मि.मी, महाबळेश्वर १४ (१३७१) मि.मी. पावसाची नोंद झाली.

Koyana Dam Satara
Satara Water Crisis: सातारा जिल्ह्यात ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार

सातारा जिल्ह्यात धरण क्षेत्रातील पाऊस सोडल्यास इतर तालुक्यात पावसाने दांडी मारली आहे. यामुळे पावसाळ्यात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. उन्हाळ्यात गोळा केलेल्या सुक्या चाऱ्याचा साठा संपत आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

दुष्काळी आणि अन्य भागातील जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात सुका चारा संपत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच जनावरांच्या दुध उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com