Kolhapur Rain Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरीप, धरण क्षेत्रात अतिवृष्टी

Kolhapur Rain : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान कालपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Monsoon Update : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान कालपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. घाटमाथ्यांवरील तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती.

तर जिल्ह्यातील मुख्य असलेल्या राधानगरी धरणासह सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टीचा पाऊस झाला. कालपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

१ जुलैपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनाचीही चिंता वाढली होती. परंतु मागच्या २४ तासांपासून पावसाची सुरूवात झाली. याचबरोबर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पूर्व भागात कमी जास्त पाऊस होता.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी (६८), पाटगाव (१४७), कुंभी ( ११५), घटप्रभा (१०२), कुंभीत (९३ मि. मी.) धुवाँधार पाऊस झाला. अन्य धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत सरासरी १८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात ५१.६, भुदरगड तालुक्यात ४०.१, राधानगरीत ३१.३, आजऱ्यात ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात ७ मि. मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. ही भात शेती पूर्णत पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंतेत होता.

कालपासून सूरू झालेल्या पावसामुळे भात शेतीच्या रोपलावण कामांना वेग आला आहे. याचबरोब कृषी केंद्रांमध्येही अन्य खरीप पिकांच्या बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT