Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain update : सुरगाणा, मालेगाव तालुक्यांत पावसाचा जोर

सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; शेतकरी हैराण

Team Agrowon

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने (Heavy rain) जोर धरला आहे. त्यामध्ये सिन्नर,( Sinner) इगतपुरी, चांदवड, नाशिक, दिंडोरी व निफाड तालुक्यांना पावसाने मोठा फटका दिला. आता या भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. तर सोमवारी (ता. १२) जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी (ता. १३) सुरगाणा व उंबरठाणा महसूल मंडलात ५६.५ मिमी पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी महसूल मंडलात ६० मिमी इतका नोंदविला गेला.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर असताना पूर्व भागातील मालेगाव तालुक्यातही सर्व दूर पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये मालेगाव, दाभाडी, कळवाडी, झोडगे परिसरात जोर दिसून आला. सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी या पिकांना प्रामुख्याने फटका बसला आहे. पावसाचे पाणी शिवारात साचून राहिल्याने जिल्ह्यात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये घेवडा, भोपळा या पिकांचे नुकसान वाढते आहे. यासह कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. रोपवाटिका बाधित झाल्याने त्याचा एकंदरीत परिणाम कांदा लागवडीवर होत असल्याचे दिसून येत आहे. शेती कामे होण्यासाठी पावसाचा काही दिवस खंड पडणे अपेक्षित आहे; मात्र पावसामुळे एकंदरीत शेती कामांचे नियोजन कोलमडल्याची स्थिती आहे. प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये ढगाळ वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. शेतकरी रोगप्रतिबंधात्मक फवारण्या करत असून त्याचा परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कळवण, नांदगाव, नाशिक, पेठ, निफाड, सिन्नर, येवला, त्र्यंबकेश्वर, देवळा, चांदवड तालुक्यांत पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिंडोरी तालुक्यात कोशिंबे परिसरात पावसाचा जोर कायम होता. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर सर्वत्र होता. त्यामध्ये शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दारणा धरणातून विसर्ग वाढविला पावसाचा जोर काही अंशी कमी झाल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत ८९३८ क्युसेक विसर्ग सोमवारी (ता. १२) रात्री उशिरापर्यंत सोडला जात होता; मात्र पुन्हा दारणा नदीतून पाणी वाढल्याने ११०० वरून १९०० क्युसेक इतका विसर्ग मंगळवारी (ता. १३) सकाळी ६ वाजता वाढविण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

Sugarcane Farm Fire: पेटत्या उसात शिरून २५ एकर ऊस वाचविला

Sugarcane Price Dispute: सांगली जिल्ह्यात रात्री ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात; ऊसदराचा तिढा कायम; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT