Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस

मॉन्सून दाखल झाल्यापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी आणि त्यानंतर पावसाची रिपरिप असे दिवसभर चित्र होते.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः मॉन्सूनचे आगमन (Monsoon Arrival) झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी जिल्ह्यात जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता.२४) रात्रभर पाऊस (Rain Update) सुरू होता. सरीवर सरी कोसळत आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. पाण्याच्या पातळीत देखील आता वाढ होऊ लागली आहे. शेतीकामांना देखील वेग आला आहे. काही शेतकऱ्यांनी भातरोपे लागवड (Paddy Planting) करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली आहे.

मॉन्सून दाखल झाल्यापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी आणि त्यानंतर पावसाची रिपरिप असे दिवसभर चित्र होते. परंतु सायकांळनंतर पावसाचा जोर वाढला. शनिवारी (ता. २५) पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. सतत पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे आतापर्यंत कोरडे असलेले नदी, नाले प्रवाहित झाले आहेत.

पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वर्षीच्या हंगामात आतापर्यंत एकदाही दमदार पाऊस न झाल्यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते. या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातरोपे लागवडीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. मे अखेरला तयार केलेल्या भातरोपवाटिकेतील भातरोपे काढणीला देखील काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास येत्या चार-पाच दिवसांत नियमित भातरोप लागवडीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT