Rain update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : सातारा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

या पावसामुळे सोयाबीन काढणी ठप्प झाली आहे. काढणीस आलेली सोयाबीन, बाजरी, ज्वारी भिजल्याने नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार (Heavy Rainfall) पाऊस गुरुवारी (ता. ६) झाला. २४ तासांत सरासरी ३०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सोयाबीन काढणी (Soybean Harvest) ठप्प झाली आहे. काढणीस आलेली सोयाबीन, बाजरी, ज्वारी भिजल्याने नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

दुपारपासून पावसास सुरुवात झाली सातारा, जावळी, पाटण, कऱ्हाड, कोरेगाव व महाबळेश्‍वर तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. या पाच तालुक्यांत ३० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या तालुक्यांत अनेक ठिकाणी तीन तासांपेक्षा अधिक काळ संततधार पाऊस झाला आहे.

खटाव, फलटण, खंडाळा, वाई तालुक्यांत २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.माण तालुक्यात तुलनेत कमी पाऊस झाला आहे. या तालुक्यात सरासरी १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे.

काढणी आलेले सोयाबीन, बाजरी ज्वारी भिजली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शेतात पाणी साचल्याने स्ट्रॉबेरी लागवड ठप्प होणार आहे. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये सातारा ४१.४, जावळी ३८.७, पाटण ३०.३, कऱ्हाड ३३.२, कोरेगाव ३३.९, खटाव २१.५, माण १५, फलटण २५, खंडाळा २५.२, वाई २१, महाबळेश्‍वर ४१.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT