Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain Maharashtra : राज्यात वादळी पावसाने दाणादाण

जवळपास दोन आठवड्यांनंतर बुधवारी (ता. ३१) सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने काही अतिवृष्टीची नोंद झाली.

टीम ॲग्रोवन

पुणे : जवळपास दोन आठवड्यांनंतर बुधवारी (ता. ३१) सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला. वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने काही अतिवृष्टीची (Excessive Rain) नोंद झाली. अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहिले. त्यामुळे पिके पाण्याखाली (Crop Under Water) गेली. तर मराठवाड्यासह दुष्काळी भागातील पिकांना या पावसाने दिलासा मिळणार आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत प्रदीर्घ खंडानंतर बुधवारी रात्री मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लावली. बीड व लातूरमधील प्रत्येकी एक, तर उस्मानाबादमधील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. पाच जिल्ह्यातील २० मंडल वगळता झालेला हा पाऊस पिकांसाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विजांच्या कडकडाटासह बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. या वेळी वीज अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू, तर तिघे जखमी झाल्याची घटना काळेगाव (घाट) येथे घडली.

गणरायाच्या आगमनाबरोबर सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. ३१) सायंकाळी जिल्ह्याच्या बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले. दुष्काळी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. हा पाऊस पश्‍चिमेकडील तालुक्यांना फायदेशीर ठरणार असला, तरी पूर्वेकडील घेवडा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. जोरदार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती आहे.

सांगली जिल्ह्यातील विविध भागांत बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सहानंतर मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पाऊस सुरू होता. दुष्काळी पट्ट्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. जवळपास पंधरा दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हलक्या जमिनीत पिके वाफसा स्थितीत आली होती. हलक्या जमिनीत पिकांना पाण्याची आवश्यकता होती. त्यातच पाऊस झाल्याने पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे.

कोकण :

पालघर : डहाणू ४७, जव्हार ४३, मोखाडा ११७,

तलासरी ६५,

रायगड : खालापूर ५८, माथेरान ९१, पोलादपूर ८०.

रत्नागिरी : चिपळूण ६५, मंडणगड ४४, संगमेश्वर ५६.

सिंधुदुर्ग : कणकवली ४९, कुडाळ ३५, सावंतवाडी ४१.

ठाणे : मुरबाड ७०, उल्हासनगर ५०.

मध्य महाराष्ट्र :

नगर : अकोले १६६, पारनेर ६१, राहता ११३, संगमनेर ६१, सावळीविहीर ६०.

धुळे : धुळे ५५, गिधाडे ७०, शिरपूर ५८.

जळगाव : यावल ६५.

नाशिक : दिंडोरी ८२, इगतपुरी ८०, नाशिक ६७, ओझरखेडा ८८, सिन्नर ८६, त्र्यंबकेश्‍वर ७१.

पुणे : घोडेगाव ६५, जुन्नर ८५, शिरूर ५५.

सांगली : जत ६१.

सातारा : सातारा ५७.

मराठवाडा :

औरंगाबाद : कन्नड ६८.

बीड : अंबाजोगाई ४६.

जालना : बदनापूर ४५.

उस्मानाबाद : भूम ४३, कळंब ४१, परांडा ४०, वाशी ४६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT