Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : कासारसिरसी महसूल मंडलात मुसळधार पाऊस

Latest Rain Update : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती ऑक्टोबर महिना पूर्णतः निरंक गेल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर या सर्वाधिक पेरा असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

Team Agrowon

Latur News : तालुक्यातील कासारसिरसी महसूल मंडलात शनिवारी (ता. २३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उस्तूरी (ता. निलंगा) येथील ओढ्याला पूर आला असून या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. अन्य चार महसूल मंडलांतही चांगला पाऊस झाला आहे.

निलंगा शहरासह ग्रामीण भागातील काही महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. कासारसिरसीतील दहा महसूल मंडलांपैकी आठ महसूल मंडलांत पावसाने हजेरी लावली असली, तरी निटूर व पानचिंचोली महसूल मंडलांत मात्र पाऊस झाला नाही.

तालुक्यातील कासारसिरसी, निलंगा, कासारबालकुंदा, भुतमुगळी, मदनसुरी, आंबुलगा-बु, औरादशहाजानी आदी महसूल मंडलांत मोठा पाऊस झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती ऑक्टोबर महिना पूर्णतः निरंक गेल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर या सर्वाधिक पेरा असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

सध्या तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी अतिशय कमी असून बडूर, केदारपूर, निलंगा, लांबोटा, शेडोळ, कासारबालकुंदा यासह आदी लघू प्रकल्पात पाणीसाठा नाही, शिवाय मांजरा व तेरणा या दोन्ही नद्या अजूनही कोरड्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

पाऊस स्थिती (मिलिमीटरमध्ये)

कासारसिरसी ६२ मिलिमीटर, निलंगा- ३५ मी.मी, कासारबालकुंदा - ४० मी. मी, मदनसुरी- ४८ मी. मी, हलगरा- २८ मी.मी, आंबुलगा- १८ मी.मी, भुतमुगळी- ३७ मी.मी तर पानचिंचोली ५ मी.मी, निटूर ५ मी.मी, औरादशहाजानी १८ मी.मी. असा महसूल मंडलात पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT