Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा तडाखा पिकांत पाणी शिरल्याने नुकसान

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याचे दिसत असताना मंगळवारी (ता.११) पहाटेपासून जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याचे दिसत असताना मंगळवारी (ता.११) पहाटेपासून जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस (Heavy Rainfall) होत आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या (Satpuda Mountain Range) पायथ्याशी असलेल्या भागात प्रामुख्याने ढगफुटीसदृश पाऊस (Cloudburst like Rain) झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

यामुळे अकोट-हिवरखेड मार्गावरील वाहतूक अनेक तासांपर्यंत ठप्प पडली होती. शिवाय पुराचे पाणी शेतांमधून वाहिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन, कापसाचा हंगाम जोरात सुरू झालेला असतानाच पाच दिवसांपासून होत असल्याने पावसाने पिकांचे वाटोळे झाले आहे.

सोंगणीला आलेली सोयाबीन, सोंगणी केलेले सोयाबीन पावसात भिजले. अनेक ठिकाणी सोयाबीन पेंड्यांमधून कोंब बाहेर फुटले आहेत. सतत सोयाबीन ओले होत असल्याने काळवंडत आहे. सोमवारी (ता.१०) रात्री व मंगळवारी (ता.११) सकाळी झालेल्या जोरदार पावसाने तर आता सोयाबीनचे पीक पूर्णतः हातातून जाते की काय

अशी शक्यता अकोट, तेल्हारा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. अकोट तालुक्यात अकोलखेड, उमरा या महसूल मंडळांना दोन दिवसांत पावसाने मोठा फटका दिला. या भागात प्री-मॉन्सून कपाशीची लागवड केल्या जाते.

या कापूस पट्ट्यात वेचणीला सुरुवात झालेली आहे. दसऱ्यापासून वेचण्यांना प्रारंभ होताच पावसाने ठाण मांडले. परिणामी बोंडामधून फुटलेला कापूस झाडांवरच लटकला आहे. दररोज पाऊस होत असल्याने कापूस पिवळा पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT