Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यातील ८ मंडलांमध्ये अतिवृष्टी

Heavy Rains in Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ३० मंडलांत गुरुवारी (ता. २७) दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढला.

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यातील शुक्रवारी (ता. २८) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्व ३० मंडलांत सरासरी ४१.४ मिलिमीटर पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर मंडलात ६९.५ मिमी, डोंगरकडा ८१, वारंगा ११२ मिलिमीटर या ३ मंडलांमध्ये, वसमत तालुक्यातील वसमत मंडलात १६५ मिलिमीटर, अंबा ७३.५, हयातनगर १६५, गिरगाव ११४, कुरुंदा ८१.८ मिलिमीटर या ५ मंडलांमध्ये मिळून जिल्ह्यातील एकूण ८ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. नाले, नद्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतात शिरल्याने जमिनी खरडून गेल्या. केळी, हळद, भाजीपाल्यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ३० मंडलांत गुरुवारी (ता. २७) दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढला. कळमनुरी, वसमत तालुक्यांतील अनेक मंडलांत रात्री आठपर्यंत पाऊस जोरदार पाऊस झाला. कळमनुरी व वसमत तालुक्यांतील ८ मंडलांत अतिवृष्टी झाली.

त्यापैकी चार मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. वसमत शहरातील गुरुद्वार परिसरातील १०० वर्षे जुना बडा तलाव फुटल्याने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने १५० नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यात जुलै महिन्यात शुक्रवार (ता. २८)पर्यंत एकूण सरासरी ३६६.४ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ४११.५ मिलिमीटर (१०९.१ टक्के) पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत सरासरी १३.३ मिलिमीटर पाऊस झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला. जिल्ह्यात जुलै महिन्यात आजवर एकूण सरासरी २०७.७ मिलिमीटर, तर यंदा १ जूनपासून एकूण २६३.२ मिलिमीटर (७६.७ टक्के) पाऊस झाला.

तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ः १८.६, कळमनुरी ६०.७, वसमत ९४.२, औंढा नागनाथ ९.४, सेनगाव १०. परभणी जिल्हा ः परभणी ११.१, जिंतूर ६.३, सेलू ३.५, मानवत ८.८, पाथरी ६.४, सोनपेठ १३, गंगाखेड २०.२, पालम २५.२, पूर्णा २८.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT